प्रश्न १७- संमोहनाच्या प्रभावाखाली एखाद्या व्यक्तीस चोरी करावयास लावणे शक्य आहे काय?
उत्तर- ज्या व्यक्तीने पूर्व - आयुष्यात कधीही चोरी केलेली नाही वा चोरी
करणे पाप आहे असा पक्का समज ज्या व्यक्तीचा आहे, अशा व्यक्तींकडून संमोहित
अवस्थेत चोरी करून घेणे अशक्य आहे. संमोहन अवस्थेत व्यक्ती स्वतःला अनैतिक
वाटणाऱ्या सूचना स्वीकारत नाही. अशा सूचना मिळाल्यास एकतर संमोहन अवस्थेतून
ती जागृत अवस्थेत येते अथवा त्या अवस्थेत राहूनही त्या विशिष्ट
सूचनांप्रमाणे वर्तन करणे नाकारते.
समजा एखादा चोर आहे – त्याला संमोहन अवस्थेमध्ये नेल्यानंतर चोरी करण्याची सूचना दिली तर तो ती सूचना अमलात आणेल. कारण चोरी करणे अनैतिक आहे असे त्याला वाटत नसते. (परंतु याचाच अर्थ असा की, चोरी करण्यासाठी त्याला संमोहन अवस्थेत नेण्याची गरज नाही. जागृत अवस्थेमध्येही तो न ओशाळता, न घाबरता चोरी करेल. तीच गोष्ट तो संमोहन अवस्थेत करेल एवढेच.) संमोहनाच्या प्रभावाखाली हे दुष्कृत्य करण्यास तो धजावला, असा त्याचा अर्थ नाही.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व समजा एखादा चोर आहे – त्याला संमोहन अवस्थेमध्ये नेल्यानंतर चोरी करण्याची सूचना दिली तर तो ती सूचना अमलात आणेल. कारण चोरी करणे अनैतिक आहे असे त्याला वाटत नसते. (परंतु याचाच अर्थ असा की, चोरी करण्यासाठी त्याला संमोहन अवस्थेत नेण्याची गरज नाही. जागृत अवस्थेमध्येही तो न ओशाळता, न घाबरता चोरी करेल. तीच गोष्ट तो संमोहन अवस्थेत करेल एवढेच.) संमोहनाच्या प्रभावाखाली हे दुष्कृत्य करण्यास तो धजावला, असा त्याचा अर्थ नाही.
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा